आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parvez Mushraff Health Check By Medical Board, Court Decision

परवेज मुशर्रफ यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी न्यायालयाने स्थापन केले वैद्यकीय मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी विशेष न्यायालयाने एक वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे.हे मंडळ मुशर्रफांची तपासणी करून आपला अहवाल न्यायालयास सादर करणार आहे. विशेष न्यायालयात त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे. मुशर्रफ यांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने गुरुवारी सुनावणीच्या वेळेस केला होता. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाकडून 24 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला आहे. तसेच मुशर्रफ यांना 23 जानेवारीपर्यंत न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्यातूनही सवलत दिली आहे. वैद्यकीय मंडळात रावळपिंडीच्या ऑफ आर्म्ड फोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजीचे (एएफआयसी) डॉक्टरांचा समावेश आहे. मुशर्रफ लष्कराच्या याच रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
भारतीय पत्रकारांसारखा पाकिस्तानी मीडियाही पैसेखाऊ !
उपचाराविना सोडल्यास मृत्यू
मुशर्रफ यांच्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांना कॉरोनरी आर्टरीशी संबंधित गंभीर आजार आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. वेळीच उपचार न केल्यास मृत्यूही ओढवू शकतो.
सुटका झाल्याशिवाय परदेशी जाणार नाही : आजाराचे कारण पुढे करून मुशर्रफांचा परदेशात पलायन करण्याचा इरादा आहे, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. मात्र न्यायालयाने आरोपातून मुक्त केल्याशिवाय मुशर्रफ देश सोडणार नाहीत, असे त्यांचे निकटवर्तीय आणि माजी उपपंतप्रधान चौधरी परवेज इलाही यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय मंडळास न्यायालयाचे प्रश्न
1. मुशर्रफ यांना शस्त्रक्रियेची खरोखरच किती गरज आहे ?
2. उपचारानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल.
नेमके प्रकरण काय ?
70 वर्षीय मुशर्रफ यांनी सत्तेवर असताना अधिकाराचा गैरवापर करून देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर मायदेशी परतलेल्या मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू झाला. परंतु गेल्या महिन्यात सुनावणीला जाताना त्यांना हृदयरोगाचा धक्का बसला. त्यामुळे त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.