आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passangers Enjoy Journey In Fastest Bullet Train In Japan

VIDEO: जपानमध्ये 500 किमी प्रति तास गतीने पहिल्यांदाच धावली बुलेट ट्रेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी.)
टोकियो (जपान)- मध्य जपानच्या लोकांनी जगातील सर्वांत गतीने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. यावेळी ट्रेन 500 किलोमीटर प्रति तास या गतीने धावत होती. उनोहारा (Uenohara) आणि फ्यूफुकी (Fuefuki) या शहरांमध्ये धावलेल्या ट्रेनमध्ये यावेळी 100 प्रवासी होते. दोन्ही शहरांमधील अंतर 42.8 किलोमीटर आहे.
चुंबकीय ट्रॅकवर धावणारी ही जपानमधील पहिली व्यावसायिक ट्रेन आहे. या तंत्रज्ञानाला जपानने मॅगलेव्ह ट्रेन असे नाव दिले आहे. सेंट्रल जपानची रेल्वे कंपनी गेल्या आठ दिवसांपासून या तंत्रज्ञानाचे एक्सपेरिमेंटल ट्रायल घेत होती. सध्या जपानमध्ये असलेल्या बुलेट ट्रेनची गती 320 किलोमीटर प्रति तास एवढी असते.
मॅगलेव्ह ट्रेन 16 डब्यांची असेल. यात एकावेळी 1 हजार प्रवासी प्रवास करु शकतील. भविष्यात अशा प्रकारची ट्रेन संपूर्ण जपानमध्ये चालवली जाणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या ट्र्रेनचा रोमांचकारी व्हिडिओ...