(युएस एअरवेजच्या एका विमानात एक प्रवाशाने मस्करीत मला इबोला झालाय, असे सांगितल्यावर चांगलाच गोंधळ उडाला.)
Hazmat (hazardous materials) नावाच्या टीमला विमानात बोलवले
न्युयॉर्क (अमेरिका)- जगभरात सुमारे 4,000 लोकांचा बळी घेणाऱ्या धोकादायक इबोला व्हायरसची जनतेत किती भीती पसरली आहे, याचा प्रत्यय अमेरिकेतून डॉमिनिक रिपब्लिकमध्ये जात असलेल्या एक विमानात आला. एका प्रवाशाने मस्करीत स्वतःला इबोला झाला आहे असे सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी एका प्रवाशाने याचा व्हिडिओ तयार केला आणि इंटरनेटवर अपलोड केला. युट्यूबवर दोन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या हा व्हिडिओ तब्बल 40 लाख लोकांनी बघितला आहे.
प्रवाशाने सांगितला इबोलाचा जोक
हा प्रवासी उत्तर अमेरिकेतील आहे. विमानात एकूण 290 प्रवासी होते. मी आफ्रिकेतून आलोय. मला इबोला झालाय, असे त्याने सांगितल्यावर जोरदार गोंधळ उडाला. विमान विमानतळावर उतरल्यानंतर कॅबिन क्रूने सर्व प्रवाशांना जागेवरच बसून राहण्यास सांगितले. त्यानंतर Hazmat (hazardous materials) नावाच्या टीमने विमानात प्रवेश केला. संबंधित प्रवाशाची तपासणी केली. यावेळी असे आढळून आले, की हा प्रवासी आफ्रिकेतून आला नव्हता आणि त्याला इबोलाही झालेला नव्हता.
इबोला झाल्याचे सांगितल्यावर विमानात कसा गोंधळ उडाला, बघा पुढील स्लाईडवर...Hazmat (hazardous materials) टीम विमानात आली तेव्हा... बघा व्हिडिओ...