आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात साप निघाल्याने प्रवाशांना फुटला घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - विमानाच्या दारात छोटा साप आढळून आल्याने प्रवाशांना रात्रभर ताटकळत राहावे लागल्याची घटना सिडनी विमानतळावर पाहायला मिळाली. सर्वांची भंबेरी उडवून देणारा हा साप होता केवळ 2 0 सेंटीमीटर लांबीचा.


ऑस्ट्रेलियन क्वाँटास जेट रविवारी रात्री टोकियोच्या दिशेने जाण्यास सज्ज झाले होते, परंतु अचानक विमानाच्या दारात हा लहान साप दिसून आला. विमानात 370 प्रवासी होते. साप असल्याने प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांना उतरावे लागले. साप काढण्याचे प्रयत्न बराच वेळ चालले. त्यामुळे अनेकांना कामे पुढे ढकलावी लागली. पुढील नियोजन बारगळल्याने अनेक प्रवाशांना हॉटेलमध्ये रात्र काढण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.