फोटो: अॅनाकोंडासोबत पॉल रोसोली
ANACONDA ने एका मणुष्यास जिवंत गिळल्याचा आणि पुन्हा बाहेर काढल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या आश्चर्यकारक व्हिडिओबद्दल मोठ्याप्रमाणावर वाद निर्माण होत आहेत. प्राणीप्रेमी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे.
पॉल रोसोली (Paul Rosolie) असे व्हिडिओ निर्मात्याचे नाव आहे. पॉल निसर्गवादी आहे तसेच चित्रपट निर्मातासुध्दा आहे. व्हिडिओ निर्मितीसाठी पॉलने वेगळ्या प्रकारचा 'स्नेकसुट' तयार केला होता. स्नेकसुट परिधान करुन तो स्वत: ANACONDA चे भक्ष बनला होता.
हा व्हिडिओ 7 डिसेंबर रोजी डिस्कवरी चॅनलवर प्रसारीत केल्या जाणार आहे. सध्या त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
26 वर्षीय पॉलने ट्वीट केले की , मी आजर्यंत एकाही जीव-जंतुला इजा केली नाही.
आपण आधी हा व्हिडिओ बघा नंतर आक्षेपार्ह विधान करा. डिस्कवरी चॅनलने हा शो दाखवू नये सासाठी प्राणीप्रेमी संघटनांनी Change.org नावच्या वेबसाइटवर स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा,छायाचित्रे आणि अंतीम स्लाइडवर व्हिडिओचा ट्रेलर...