आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paul Rosolie Video Airs On The Discovery Channel

टीव्‍हीवर दाखवण्‍यात आले 'अॅनाकोंडा'च्‍या पोटात शिरून शुट केल्‍याचे दृष्‍य, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगावेगळे काही करण्‍यासाठी रिस्‍क नावाचा फॅक्‍टर सर्वात महत्त्वाचा ठरतो याचे ज्‍वलंत उदाहरण म्‍हणजे पोल रोसोली याने केलेले साहस. अॅनाकोंडाच्‍या पोटात दाखल होऊन व्हिडीओ शुटींग करण्‍याचे सहस पोलने केले. अमेरिकेच्‍या डिस्‍कव्‍हरी चॅनवलवर पोल रोसोलचा हा थरार दाखवण्‍यात आला.
का केले धाडस-
पर्यावरण आणि जंगल वाचवण्‍यासाठी काही दिवसापूर्वी पोलने हा स्‍टंट केला होता. हा स्‍टंट म्‍हणजे मृत्‍यूशी सामना असल्‍यामुळे जगभरातील लोक आश्चर्यचकीत होऊन पाहातील याची खात्री पोलला असल्‍यामुळे त्‍यांने हे आव्‍हान स्विकारले. आणि त्‍याचा व्हिडीओ तयार केला.
कसा तयार केला व्हिडीओ-
पोलला अॅनाकोंडाने गिळल्‍यांनतर तो एक तास अॅनाकोंडाच्‍या पोटात होता. अॅनाकोंडाने पोलचा गळा आवळायला सुरूवात केली. मात्र याची खात्री पोलला असल्‍यामुळे त्‍यांने अशा प्रकारचा दबाव शरिराव पडल्‍यावर बचाव करण्‍यासाठीची सर्व तयारी केली होती. दबाव पडणार नाही यासाठी कार्बन फायबरचा सूट पोलने चढवला होता. या सुटमुळे अॅनाकोंडाच्‍या पोटातही श्‍वास घेण्‍यासाठी त्‍याला मदत होत होती.
अॅनाकोंडाची शिकार झाल्‍यानंतरही पोलने कशा पद्धतीने स्‍वत:चे प्राण वाचवले याविषयी मात्र त्‍याने काही सांगितले नाही. अमेझॉनचे जंगल वाचवण्‍याठी या स्‍टंटपासून मिळणा-या पैश्याचा वापर करण्‍यात येणार आहे.
10 डिसेंबर नंतर भारतात होणार टेलीकास्‍ट-
अमेरिकेतील 'इटन इलायव'शो दाखवल्‍यांनतर आता हा व्हिडीओ 10 डिसेंबर नंतर फिनलँड, डेनमार्क, हंगरी, पोलंड, स्‍वीडनमध्‍ये दाखवण्‍यात येणार आहे. याबरोबच भारत आणि चीन या देशामध्‍ये टेलिकास्‍ट करण्‍यात येणार आहे.
पोल आणि अॅनाकोंडाचा थरार पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...