आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Colombia Paulina Vega Wins Miss Universe 2015 Crown

PHOTOS: कोलंबियाच्या पाओलीनाने जिंकला 2015 चा मिस यूनिव्हर्स किताब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पाओलीना वेगाला मिस यूनिव्हर्सचा मुकूट बहाल करताना 2013 ची गतविजेती मिस यूनिव्हर्स ग्रॅब्रिएला इस्लर
मियामी - मिस कोलंबिया पाओलीना वेगा हिने 2015 चा मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. रविवारी रात्री अमेरिकेच्या मियामी येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये 2013 ची विजेती ग्रॅब्रिएला इस्लरने तिला यंदाचा मिस यूनिव्हर्सचा मुकूट बहाल केला. मिस यूएसए सोनिया सांचेज पहिली रनर अप, मिस यूक्रेन डायना हरकुशा सेकंड रनर अप तर, मिस नीदरलैंड्स थर्ड रनर राहिल्या.
या स्पर्धेमध्ये एकूण 88 देशांच्या सुंदरींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी बंगळूरुची नोयोनिता लोध टॉप-15 मध्ये आपले स्थान टिकवण्यात यशस्वी राहिली. या आधी म्हणजे 2000 मध्ये भारताच्या लारा दत्ताने मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकला होता.
अभ्यासावर लक्ष देणार पाओलीना -
22 वर्षीय पाओलीना कोलंबियातील बॅरनक्वीलाची रहिवासी आहे. सध्या ती बिजनेस एडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत आहे. मी या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतला होता. मला विजेतेपद मिळाल्याने मी खुप खुश आहे असे पाओलिनाने सांगितले. आता मी माझे सगळे लक्ष अभ्यासावर केंद्रित करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मिस यूनिव्हर्स स्पर्धेचे फोटो...