आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसच्या बाथरूमध्ये दिला मुलीला जन्म, आईनेच फेकून दिले कच-याच्या पेटीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हर्जिनीया - स्त्री अर्भकांची हत्या केवळ भारतातच होते असे नाही तर, व्हर्जेनिया मध्ये देखील मुलगी जन्माला आली म्हणून तिच्या आईनेच तिला कच-याच्यापेटीत फेकल्याची घटना घडली आहे. शॉन रॉबिन्सन या 27 वर्षीय महिलेने गेल्या आठवड्यात ऑफिसच्या बाथरूममध्ये एका मुलीला जन्म दिला. तिने त्या इवल्याशा जीवाला पेपर टॉवेल्समध्ये गुंडाळून कचरा पेटीत टाकले आणि ऑफिसमागील कच-यात फेकून दिले. सायंकाळच्या वेळी ही तान्हूली सेक्यूरीटी गार्डच्या नजरेस पडली, तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.

हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून कोर्टासमोर उभे केले. ज्या बिल्डिंगमध्ये ही घटना घडली शॉन त्याच बिल्‍डिंगमध्ये मसाज थेरपिस्टचे काम करते. बाथरुममध्ये जाण्याआधी तिच्या पोटात दुखत होते. त्यानंतर बाथरूममध्येच तिची प्रसुती झाली.

शॉनला एक चार वर्षांचा मुलगा आहे. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ती दोन ठिकाणी काम करते. आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने तिला नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. तिच्या सहका-यांचे म्हणणे आहे की, शॉन एक मेहनती आणि चांगली महिला आहे.