आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेंटागॉनच्या मते भारत जागतिक शक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारत जगातील मोठी शक्ती असून हा देश आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावत आहे, असे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने म्हटले आहे. भारत एक जागतिक शक्ती असून तो चांगल्या पद्धतीने जबाबदारी निभावत असल्याचे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कॅप्टन जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. अमेरिकी संरक्षण मंत्री लियोन पनेटा दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पेंटागॉनचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. पनेटा यांनी बुधवारी भारताचे संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये राजनैतिक संबंध, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या स्थितीवर चर्चा झाल्याचे मानले जाते.