आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंटागॉनकडून गेल्या वर्षी ३.१४ कोटींची व्हियाग्रा खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनने गेल्या वर्षी सैनिकांना देण्यासाठी ५,०४,८१६ डॉलरच्या (व्हियाग्राची) खरेदी केली आहे. व्हियाग्रा लैंगिक क्षमता वाढवण्यास उपयोगी ठरते. अधिकृत आकडेवारीनुसार, पेंटागॉनने औषध खरेदी करण्यासाठी २०१४ मध्ये डब्लिनच्या एका कंपनीला ६० कंत्राटे दिली होती. याव्यतिरिक्त लैंगिक शक्ती आणि क्षमता वाढवण्याची अन्य औषधेही पेंटागॉनने अमेरिकी सैनिकांसाठी खरेदी केली होती. यामध्ये लेवित्रा आणि सिएलिसचा समावेश आहे.

अमेरिकी संरक्षण विभागाने आपल्या सैनिकांना व्हियाग्रा देण्याचा निर्णय १९९८ मध्ये घेतला होता. त्या वेळी एका गोळीची किंमत १० डॉलर (साधारण ६२१ रुपये) होती. आता एक गोळी २५ डॉलरला (१,५५२ रुपये) मिळते. लष्करी धोरणानुसार, अमेरिकेत एका रुग्णास एका महिन्यासाठी सहा गोळ्या मिळतात. व्हियाग्राचा उपयोग होईलच याची खात्री दिली जात नाही. संरक्षण विभागातील डॉक्टर व्हियाग्रा देताना त्याचे साइड इफेक्ट्सही सांगतात. यामध्ये डोके किंवा पोट दुखणे, अपचन याचा समावेश आहे.