आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • People Elected Government In Jammu Kashmir, India Answered To Sharif

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मिरात जनतेने निवडून दिलेले सरकार, शरीफ यांच्या वक्तव्याचे भारताकडून खंडन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे, या शरीफ यांच्या वक्तव्याचे भारताकडून कडक शब्दांत खंडन करण्यात आले. काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार आहे. जगभरात मान्य असलेल्या लोकशाही पद्धतीने राज्यातील जनतेने आपले भविष्य निश्चित केले आहे, असे भारताने म्हटले आहे.

सहा दशकांपूर्वी संयुक्त राष्ट्राने जम्मू-काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर केला होता. जम्मू-काश्मीरमधील लोक अजूनही त्याची पूर्तता व्हावी याची प्रतीक्षा करत आहेत. सार्वमत करून घेण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे, असे मत त्यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले होते. शरीफ यांच्या वक्तव्यावर भारतीय मिशनचे पहिले सचिव अभिषेक सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.