आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पदार्थांची सिंगापूरला भुरळ, मसालेदार खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - सिंगापूरमधील अधिकाधिक बिगर भारतीय नागरिक झणझणीत, मसालेदार पदार्थ खाणे पसंत करू लागल्याने भारतीय रेस्टॉरंट्समध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. काही भारतीय रेस्टॉरंट्समध्ये येणारे 90 टक्के ग्राहक बिगर भारतीय आहेत, असे सिंगापूरमधील भारतीय हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे महोत्सव संचालक व्ही. विमल राम यांनी म्हटले आहे. सिंगापूरमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात झणझणीत भारतीय खाद्यपदार्थ आणि डिशेस प्रमोट करण्यात येत आहेत. 19 जुलै रोजी सुरू झालेला
हा महोत्सव 28 जुलैपर्यंत चालणार आहे. सिंगापूरमध्ये 350 भारतीय रेस्टॉरंट्स आहेत.

सिंगापूरमधील 70 ते 80 टक्के कुटुंबातील लहानमोठी माणसे रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट किंवा हॉकर्सकडेच जेवण करतात. घरी स्वयंपाक करणे ही सिंगापूरमधील ‘सुटीच्या दिवशीचा कौटुंबिक क्षण’ बनला आहे, असे राम म्हणाले. सिंगापूरमध्ये अगदी शालेय जीवनापासून बाहेरच्या जेवणाची सुरुवात होते.