आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Power Frees Man Trapped By Perth Train, Divya Marathi

VIDEO: जेव्हा एका माणसाला वाचवण्‍यासाठी प्रवाशी कलंडतात मेट्रो, तेव्हा काय होते वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - ऑस्ट्रेलियातील पर्थमध्‍ये बुधवारी (ता.6) रेल्वे प्रवाशांमुळे एका व्यक्तिचे प्राण वाचले. संबंधित व्यक्तिचे पाय प्लॅटफॉर्म आणि मेट्रोच्या मधोमध अडकले होते.
बुधवारी सकाळी 8.50 वाजल्याच्या सुमारास रेल्वेत चढताना एका व्यक्त‍िचा तोल गेला. तो रेल्वे आणि फ्लॅटफॉर्मच्या दरम्यान असलेल्या रिकाम्या जागेत फसला. यावेळी स्टेशनवर उपस्थित प्रवाशांनी 10 हजार टन वजनाची रेल्वे तिरपी करून अडकलेल्या व्यक्तिला बाहेर काढले.
सं‍बंधित व्यक्त‍ि दरवाज्याजवळ थांबला होता. जसा तो रेल्वेत चढायला लागला, त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो फटीत अडकला. यावेळी आम्ही तातडीने चालकाला रेल्वे थांबवण्‍याचे आदेश दिले, असे रेल्वे नेटवर्क कंपनी ट्रान्सपर्थचे प्रवक्ते डेव्हिड हायन्स यांनी सांगितले.
आमचे कर्मचारी आणि प्रवाशी यांनी रेल्वेला तिरपे करून अडकलेल्या व्यक्त‍िला सुखरूप बाहेर काढले, अशी माहिती डेव्हिड यांनी दिली. आश्‍चर्य म्हणजे त्याला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. या घटनेबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा चालू आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा व्हिडिओ........