पॅरिस- फ्रान्समधील 'चार्ली हेब्दो' या मासिकाच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर पॅरिसवर हल्ल्याच्या मालिका सुरुच आहे. पॅरिसमध्ये शुक्रवारी आणखी एक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. पॅरिसमधील कोलंब भागातील एका पोस्ट ऑफिसमध्ये अज्ञात बंदूकधारी हल्लेखोराने तिघांना वेठीस ठेवले होते. मात्र, फान्स पोलिसांनी बंदूकधारी हल्लेखोराला तत्काळ अटक करून तिघांची सुरक्षित सुटका केली.
मिळालेली माहिती अशी की, उत्तर पॅरिसमधील चार्ल्स डी गॉले भागात स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता एका बंदूकधारी हल्लेखोर पोस्ट ऑफिसमध्ये घुसला. हल्लेखोराने स्वत: पोलिसांना फोन करून त्याच्याकडे मोठ्याप्रमाणात ग्रेनेड आणि क्लाश्निकोव्ह रायफल असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण परिसर रिकामा केला. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टर देखील तैनात ठेवले होते. एएफपीनुसार, पोलिसांनी हल्लेखोराशी संपर्क साधून ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले. हल्लेखोर दहशवादी नसून तो एक भूरटा चोर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन ओलिसांची सुखरुप सुटका केली. या हल्ल्याचा 'चार्ली हेब्दो'वरील हल्ला आणि एका सुपरमार्केटवर झालेल्या हल्ल्याशी काही संबंध आहे की नाही? यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत
दरम्यान,पॅरिसमधील 'द गरे दी आयईस्ट' रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन तत्काळ रिकामे करण्यात आले आहे. पोलिसांनी 10 संशयीतांना ताब्यात घेतले आहे. कोलंबसमधील हल्ला आणि 'द गरे दी आयईस्ट' देण्यात आलेली धमकी यात काही कनेक्शन आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित छायाचित्रे...