आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Wants Any How Condition To Listen Modi At Indian Madison Square

अमेरिका दौरा: नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी लोक स्वयंसेवक होण्यास तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत आगमन झाले आहे. मात्र अमेरिकेतील भारतीय मेडिसन स्केअरमध्ये त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रविवारची प्रतीक्षा करत आहेत. काहीही झाले तरी मोदींचे भाषण ऐकायचेच यासाठी भारतीयांची तयारी आहे. ज्यांना तिकीट मिळाले नाही त्यांची कार्यक्रमस्थळी स्वयंसेवक होण्याची तयारी आहे.

अटलांटामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पलक जैन म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांच्या वेळी मी नव्हतो. मी सरदार पटेलांना पाहिले नाही. मात्र मला नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची इच्छा आहे. पलक १५ वर्षांपासून अमेरिकेत आहे. संपूर्ण अमेरिकेतून तसेच कॅनडापर्यंत अनेकांनी ई-मेल्सद्वारे तिकिटाची िवचारणा केली आहे. मात्र, सर्व १८ हजार तिकिटे आठवडाभरातच विकली होती. मोदींच्या कार्यक्रमासाठी हजारो डॉलर्स देण्यास व स्वयंसेवक बनण्यास तयार झाले आहेत. दक्षिण कॅरोलिनातील व्यावसायिक राकेश गुप्ता हे त्यापैकीच एक आहेत. मोदींच्या कार्यक्रमाला साधारण १८ हजार ५०० नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठे वार्तांकन
मोदी अमेरिकेत सर्वात जास्त चर्चेत राहिलेले भारतीय नेते होतील. संपूर्ण अमेरिकी आउटलेट्स २००९ मध्ये मनमोहनसिंग यांच्या तुलनेत या वेळी एअर टाइम, वेब आणि प्रिंट मीडिया मोदींना जास्त वेळ देतील. वॉल स्ट्रीट जनरल, वॉशिंग्टन पोस्टसारख्या वृत्तपत्रांच्या वेबसाइटने वार्तांकन सुरू केले आहे.