आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peoples Democratic Party Won The Election In Bhutan

भूतानमध्ये सत्तांतर; पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या हाती सत्तेची सूत्

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिम्पू - भूतानमध्ये शनिवारी झालेल्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने सत्तांतर घडवून आणत विरोधी पक्ष पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) हाती सत्तेची सूत्रे दिली आहेत. लोकशाही प्रणालीनुसार झालेल्या मतदान प्रक्रियेत 80 टक्के मतदारांनी हक्क बजावला. रात्री तत्काळ झालेल्या मतमोजणीत पीडीपीला दोन तृतीयांश मते मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणूक रिंगणात 94 उमेदवार होते. गेल्या निवडणुकीत पीडीपीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या.


80 टक्के मतदान
भूतानमध्ये शनिवारी शांततेत 80 टक्के मतदान झाले.देशात दुस-यांदा झालेल्या निवडणुकीत नागरिकांनी भरभरून मतदान केले. 47 सदस्यीय नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत सत्ताधारी द्रुक फुनसम शोगपेला (डिपीटी) केवळ 15 जागांवर समाधान मानवे लागले आहे. गेल्या वेळी पक्षाला 45 जागा मिळाल्या होत्या. सभागृहात सत्ता स्थापनेसाठी 24 जागा आवश्यक असताना पीडीपीने 32 जागी विजय मिळवला. अर्थात पीडीपीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. विजयानंतर पक्षाचे सरचिटणीस सोनम जात्शो यांनी जनतेचे आभार मानले. त्याचबरोबर भूतानमधील जनतेच्या आकांक्षा जरूर पूर्ण करू अशी ग्वाही देखील जात्शो यांनी दिली.


गॅस सबसिडी पूर्ववत
निवडणुकीत भारताचे सहकार्याची भूमिका जेवढी महत्वाची राहिली. तेवढाच निवडणूक प्रचारात केरोसिन-घरगुती गॅस अनुदानाचा मुद्दा कळीचा बनला होता. सत्तेवर आल्यावर भारतासोबतचे संबंध सुरळीत करण्याचे आश्वासन पीडीपीने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताने गॅस व केरोसिनचे अनुदान बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.


शाही परिवार
> राजा धार्मिक प्रकरणांवर निगराणीचे काम करतो. ही परंपरा 1616 पासून आहे.
> 1907 मध्ये जनतेने गोंग्सा उगेन वाँगचूक यांना राजा बनवले. त्यानंतरही हेच कुटुंब देशावर राज्य करत आहे.
भ्रष्टाचाराचे आव्हान : पहिल्या टप्प्यातील निवडणूक 31 मे रोजी झाली आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाला 45 टक्के व पीडीपीला 33 टक्के मतदान झाले होते. नव्या सरकारसमोर भ्रष्टाचार निर्मूलनाचे सर्वात मोठे आव्हान आहे.