आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेप्सीने कात टाकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - शीतपेय उद्योगात आघाडीवर असलेल्या पेप्सीने 17 वर्षांत 567 ग्रॅमच्या बाटलीचा आकार पहिल्यांदाच बदलला आहे. नवीन बाटली पकडण्यासाठी अधिक सुलभ व्हावी म्हणून खालचा भाग बदलण्यात आला असून बाटलीतील जास्तीत जास्त पेय दिसावे म्हणून पेप्सीच्या वेष्टनाचा आकारही कमी करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत कोका-कोलाने गिळंकृत केलेली बाजारपेठ पुन्हा मिळवण्यासाठी पेप्सीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बाटलीचा बदललेला आकार हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. एप्रिलपासून ही नवीन बाटली बाजारपेठेत ग्राहकांच्या हाती पडेल.

1996 मध्ये सध्या बाजारात असलेली पेप्सीची बाटली सादर करण्यात आली होती. नवीन बाटली संपूर्ण जगभरातील बाजारपेठेत पोहोचण्यासाठी किमान एक वर्ष लागणार आहे
1993 मध्ये कोका-कोलाने 567 ग्रॅमची कॉनटूर बॉटल बाजारपेठेत सादर केली. त्यानंतर तिच्या आकारात काही किरकोळ बदल करण्यात आले होते.
04 टक्के घसरण गेल्या वर्षी उत्तर अमेरिकेत पेप्सीच्या शीतपेयांच्या विक्रीत झाली. बाजारपेठेत पुन्हा जम बसवण्याचे जोरदार प्रयत्न असतानाही ही घसरण नोंदवण्यात आली आहे.