आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायमस्वरूपी नागरिकत्व विधेयकाचा मसुदा फुटल्याने ओबामांना हादरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील भारतीयांसह लाखो लोकांच्या कायमस्वरूपी नागरिकत्वाच्या अहवालाचा मसुदा फुटल्याने देशात खळबळ उडाली आहे. भारतातील अडीच लाख नागरिकांसह 1 कोटी 10 लाख लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न मार्गी लागत असतानाच ही योजना जाहीर झाल्याने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना हादरा बसला आहे.

अमेरिकेतील एका वृत्तपत्राने हा मसुदा जाहीर केल्यामुळे सरकारच्या रणनीतीचे चित्रही उजेडात आले आहे. आठ वर्षांचे नागरिकत्व, कायम व तात्पुरत्या स्वरूपातील नागरिकत्वाचा विषय त्यातून स्पष्टपणे जाहीर करण्यात आला आहे. ‘यूएसए टूडे’ने पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या या दूरदर्शी योजनेची माहिती फोडली आहे. ओबामा यांनी अमेरिकेत बेकायदेशीर राहणा-यांना कायदेशीर नागरिकत्व देण्यासाठी कायद्यातील बदलाचे संकेत दिले होते, परंतु विधेयकाच्या नवीन स्वरूपातील मसुद्याच्या तरतुदींवर देशांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. मसुद्याची माहिती बाहेर आल्याने प्रशासनाची पंचाईत वाढली आहे. कारण जनमतावर त्याचा परिणाम होऊन त्यांच्याविरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मृत्यूला आमंत्रण
मसुदा फुटल्यानंतर त्यातील तरतुदींना अयोग्य असल्याचा कांगावा करत गँग ऑफ एटने त्याचे वर्णन मृत्यूला आमंत्रण, अशा शब्दांत केले. ओबामा सरकारने मृत्यू ओढवून घेतल्याची टीका रिपब्लिकनचे सिनेटर मार्क रुबिओ यांनी केली आहे. आपली सीमा सुरक्षित करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. अनेक नागरिकांनी कायद्याची पायमल्ली करून देशात प्रवेश केला आहे. त्यांना एकप्रकारे प्रोत्साहन मिळणार आहे. यातून नागरिकत्वासंबंधीच्या कायद्यात सुधारणा होण्याऐवजी गुंतागुंतच वाढली आहे, असे रुबिओ म्हणाले.

अमेरिकी-मेक्सिको सीमा किती सुरक्षित ?
अमेरिकेत बेकायदा राहणा-या नागरिकांमध्ये मेक्सिकन लोकांची संख्या अधिक आहे. सुमारे 6 लाख 80 हजार नागरिक अमेरिकेत राहतात. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको सीमा किती सुरक्षित आहे, यावरून सत्ताधारी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. सीमा प्रश्नाचा कसलाही विचार न करता बेकायदा राहणा-या नागरिकांना कायद्याचे संरक्षण देण्याचा हा खटाटोप चुकीचा असल्याचे टीकास्त्र विरोधकांनी ओबामांवर टाकले आहे.
किती आहे स्थलांतरित
अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या खूप मोठी आहे. गृह विभागाने मार्च 2012 मध्ये जाहीर केलेल्या यादीत भारतातून 2 लाख 40 हजार नागरिक देशात रहात असल्याचे स्पष्ट केले होते. चीन (2, 80,000), फिलीपीन्स (2, 70,000) हे देश आघाडीवर आहेत. भारताचा क्रमांक यादीत तिस-या स्थानी आहे. 2000 मध्ये 1 लाख 20 हजार भारतीय अमेरिकेत बेकायदा राहत होते.
2 हजार 200 शस्त्रे
अमेरिकेत शस्त्र परवान्याविषयी काँग्रेसमध्ये अलीकडेच मांडण्यात आलेल्या प्रस्तावामुळे 2 हजार 200 शस्त्रांना वापरण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या मसुद्याला अमेरिकेतील काही गटाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. शस्त्रांचे अनेक मॉडेल आहेत. ज्यांचा उल्लेख या बंदीमध्ये नाही. त्यामुळे त्याचा वापर सार्वजनिक गोळीबारात केला जाऊ शकतो.