आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pervez Musharraf Banned From Standing In Pakistani Elections

निवडणुकीतून मुशर्रफ हद्दपार, माजी पंतप्रधान राजा अशरफही बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांची पाकिस्तानात पुन्हा सत्तेवर येण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. त्यांचा बालेकिल्ला समजला जाणा-या चित्राल मतदारसंघातील मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्जही फेटाळण्यात आला. या निकालास ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.

चार वर्षांच्या विजनवासानंतर मुशर्रफ सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुबईहून मायदेशी परतले आहेत. चार वर्षे ते दुबई आणि लंडनमध्ये राहिले. 11 मे रोजी पाकिस्तानात निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी मुशर्रफांनी चार मतदरासंघांमधून उमेदवारी दाखल केली होती.त्यापैकी कसूर,इस्लामाबाद आणि कराचीतील उमेदवारी यापूर्वीच फेटाळण्यात आली होती. त्यालाही मुशर्रफ यांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने आदेश दिल्यास तुरुंगातही जाण्याची तयारी आहे असे मुशर्रफ यांनी सांगतिले होते.

आरोप
> 2007 मध्ये घटनेची पायमल्ली करून देशावर आणीबाणी लादली.
> 60 पेक्षा अधिक न्यायधीशांना घरातच नजरकैदेत ठेवले.


आताचे संकट
बेनझीर, नवाब बुग्ती हत्याकांड खटले
लाल मशिदीत सैन्य घुसवले
देशद्रोहाचीही खटला

अशरफही बाहेर
माजी पंतप्रधान राजा परवेज अशरफही निवडणूक रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत. गुज्जर खान मतदारसंघातील त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता. पीपीपीने आव्हान दिले होते. लाहोर उच्च् न्यायालयाने ही याचिका फेटाळली.