आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफांना झटका; लष्करी न्यायालयात सुनावणीस नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना विशेष न्यायालयाने झटका दिला आहे. देशद्रोहाचा खटला लष्करी न्यायालयात चालवण्याची मागणी करणारी मुशर्रफ यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यांना 11 मार्च रोजी व्यक्तिश: हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तीन न्यायाधीशांच्या विशेष कोर्टाच्या स्थापनेसच मुशर्रफ यांच्याकडून आव्हान देण्यात आले होते. त्यांच्यावरील सुनावणी लष्करी न्यायालयात व्हावी, असे मुशर्रफ यांच्या वकिलांचे म्हणणे होते.