आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ यांना अटक होण्याची भीती; पाकिस्तानला येण्यास नकार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना अटक होण्याची भीती सतावते आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला येण्यास नकार दिला असल्याचे समजते. पाकिस्तानात होऊ घातलेल्या निवडणुकीत ते आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी 27 ते 30 जानेवारी दरम्यान पाकमध्ये येणार होते.
पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी त्यांना अटक करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुशर्रफ हे पाकिस्तानमध्ये येताच त्यांना अटक होऊ शकते. मुशर्रफ येणार नसल्याच्या वृत्तामुळे पाकमधील राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चेला उधाण आले आहे. त्यात बलुच नेता अकबर खान बागती यांच्या मुलाने मुशर्रफ यांच्या शिरावर एक अब्ज रूपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्यामुळे मुशर्रफ यांनी या भीतीपोटी पाकमध्ये येण्यास नकार दिला आहे.
मुशर्रफविरुद्ध पाकमध्ये तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची अटक अटळ आहे, असे मलिक यांनी यापूर्वी संसदेत सांगितले होते. तर खासदार रजा रब्बानी यांनी मुशर्रफ यांचे आरोपपत्र संसदेत सादर करून त्यांच्या अटकेची मागणी केली. तर मुशर्रफ यांनी पाक संविधानाचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे.
पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख मुशर्रफ यांनी 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना पायउतार करून स्वत: सत्ता काबिज केली होती. मात्र 2008 नंतर त्यांनी ब्रिटनमध्ये पलायन केले होते.
परवेज मुशर्रफ यांचे प्रवक्‍ता फवाद चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. ऑल पाकिस्तान मुस्लिम लिगचे प्रमुखाशी मतभेद असल्यामुळे आपण राजीनामा दिला असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.
देशात सत्तांतर झाल्यास लष्कराला साथ देईन- मुशर्रफ