आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pervez Musharraf's Application Reject To Pakistan Election Commission

परवेझ मुशर्रफांना झटका; दुसराही उमेदवारी अर्ज फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफांना निवडणूक आयोगाने जबरदस्त झटका दिला आहे. कराची मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज रविवार फेटाळण्यात आला. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुशर्रफ यांचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातून दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता.

कराचीमधील 250 क्रमांकाच्या मतदारसंघातून मुशर्रफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु निवडणूक अधिकार्‍यांनी तो फेटाळून लावला आहे. मुशर्रफ यांनी दोनदा घटनेचे उल्लंघन केल्याचा आरोप याच मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेले जमात-ए-इस्लामीचे नेते नियामतुल्लाह खान यांनी केला आहे. त्यावर निर्णय देताना निवडणूक आरोगानी ही कारवाई केली आहे.

यापूर्वी परवेझ मुशर्रफ यांनी पंजाब प्रांतातील कासूर मतदारसंघातून पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु तोही निवडणूक आयोगाने फेटाळला होता.

मुशर्रफ यांनी इस्लामाबाद आणि चित्राल या मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उत्तर पाकिस्तातील चित्राल मतदारसंघातून मात्र त्यांचा अर्ज स्वीकृत झाल्याचे वृत्त आहे.