आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेझ मुशर्रफ यांनी कोर्टातून ठोकली धूम; सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यावर गुरुवारी चक्क पळून जाण्याची वेळ आली. मुशर्रफ यांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी ते हायकोर्टात आले होते. सुनवाणीदरम्यान कोर्टाने मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना अटक करण्‍याचे आदेश दिले. कोर्टाचे आदेश ऐकताच मुशर्रफ यांनी कोर्टातूनच धूम ठोकली. खासगी अंगरक्षकांच्या मदतीने आपल्या बुलेटप्रूफ गाडीतून पळून जाण्यास मुशर्रफ यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला आहे. अद्याप पोलिसांनी मुशर्रफ यांना अटक केलेली नाही.
मुशर्रफ यांच्या चक शहजादमध्ये असेल्या फार्म हाऊसबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुशर्रफ यांना केव्हाही अटक होऊ शकते.

दुसरीकडे 'चोर पळाला..चोर पळाला'च्या घोषणांनी कोर्ट परिसर दणाणून गेला होता.परंतु मुशर्रफ यांचे प्रवक्ता रेजा बुखारी यांनी सांगितले की, मुशर्रफ यांनी पलायन केले नाही. मुशर्रफ गुरुवार दुपारी तीन वाजता सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहे. आपल्या विधीतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.

स्वत:वर हल्ला होण्याच्या भीतीमुळे मुशर्रफ हायकोर्ट परिसरात बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते. तसेच त्यांची गाडीही बुलेटप्रूफ आहे. विशेष म्हणजे त्यांनी खासगी अंगरक्षकांकडून सुरक्षा घेतली होती.

न्यायाधीश शौकत अजीज सिद्दकी यांनी मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कोर्टाचे आदेश मिळतात पोलिस मुशर्रफ यांच्यापर्यत पोहचण्याच्या आतच त्यांनी आपल्या अंगरक्षकांच्या मदतीने कोर्टातून सगळ्यांच्या समोरच धूम ठोकली. मुशर्रफ आपल्या बुलेटप्रूफ कारमधून पसार झाले. मुशर्रफ यांना अटक करण्‍यासाठी पोलिस रवाना झाले आहेत.

मुशर्रफ यांना सहा दिवसांची अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. मुदत संपल्यानंतर मुशर्रफ यांनी कोर्टाकडे पुन्हा जामीन अर्ज केला होता. मुशर्रफ यांच्यावर न्यायाधीशांचे अपहरण करून त्यांना नजर कैदेत ठेवल्याचा आरोप आहे. मुशर्रफ यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले होते. याप्रकरणी एफआयआर वकील चौधरी मोहम्मद असलम यांनी 11 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केली होती. परवेझ मुशर्रफ यांनी सन 2007मध्ये आणीबाणीच्या काळात न्यायाधीश इफ्तिखार मुह्म्मद चौधरींसह 60 न्याया‍धीशांचे अपहरण केले होते.