आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peshawar, 3 School Childrens Killed In Terrorists Attack

PESHAWAR: आर्मी स्कूलवरील हल्ल्यात 100 शाळकरी मुलांसह एकूण 130 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका आर्मी स्कूलवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात 130 नागरिकांचा मृत्यू झाला असून यात 100 मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरुध्‍द सुरु करण्‍यात आलेली मोहिम बंद करण्‍यात आली आहे. यात सहा दहशतवादी मारली गेली आहेत. दुसरीकडे पेशावर शहरामध्‍ये रस्त्यावर बॉम्ब स्फोट होत आहे. रिंग रोडवर पाकिस्तान पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार आमिर मुकाम यांच्या कारला लक्ष्‍य करण्‍यात आले. यात ते वाचले. मुकाम जखमी विद्यार्थ्यांना भेटून परतत होते.
दरम्यान, आत्मघातकी दहशतवाद्याने स्वतःला उडवल्याने सर्वाधिक हानी झाली आहे. पाकिस्तानी आर्मीने सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून अजून दोन दहशतवादी जिवंत असल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नाही तर प्राचार्यासह 54 जण अडकल्याचीही भीती वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, पेशावरमध्ये आणखी एक स्फोट झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या गाडीजवळ हा स्फोट झाला असून त्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, टीटीपी म्हणजे तहरीक ए तालिबान पाकिस्तानने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये असे म्हटले आहे की, आम्ही मुलांना मारले कारण लष्करही आमच्या कुटुंबीयांवर अशा प्रकारे गोळ्या झाडत आहे. त्यामुळे आप्तेष्टांना गमावण्याचे दुःख समजावे यासाठी हा हल्ला केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच द्वेषातून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असल्याचे समोर येत आहे.

मलाला युसुफजाईला नोबल मिळाल्याचा बदला
दुसरीकडे पाकिस्तानी जिओ न्यूजचे हामीद मीर यांनी मलाला युसुफजाई हिला नोबल पुरस्कार मिळाल्याचा बदला घेण्यासाठी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. मलालावर याच दहशतवादी संघटनेने गोळ्या झाडल्या होत्या.
या हल्ल्यातील जखमींची संख्याही सुमारे पन्नासहून अधिक आहे. त्यातही अनेक अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये एका जवानासह काही शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेत जवळपास सहा ते सात दहशतवादी घुसले आणि त्यांनी एकच गोळीबार केला. त्यानंतर आत्मघातली हल्लेखोराने स्वतःला उडवून घेतल्याने उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अनेकांना प्राण गमावावा लागला आहे.
नवाज शरीफ पेशावरकडे रवाना
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे तातडीने पेशावरच्या दिशेने रवाना झाले आहेत. आपण स्वतः कारवाईवर निगराणी ठेवणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच शरीफ रुग्णालयात जखमींना भेट देण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाह येथे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शाळेतील सर्व मुले माझी मुले आहेत आणि हे माझे सर्वात मोठे नुकसान असल्याचे शरीफ म्हणाले आहेत.
इमारती रिकाम्या केल्या...
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. समा टीवीच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लष्कराने कँट एरियाच्या जवळ असलेल्या वार्सक रोडवरील आर्मी स्कूलला घेराव घातला आहे. शाळेच्या आसपास अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा दहशतवादी या शाळेत घुसले आणि त्यांनी थेट अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यातील काही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लष्कराच्या गणवेशात आर्मी स्कूलमध्ये प्रवेश केला होता. शाळेच्या पाठिमागच्या बाजुला असलेल्या कब्रस्तानमधून या दहशतवाद्यांनी शाळेत प्रवेश केला.
एका जवानाचा मृत्यू
खैबर पख्तूनवाच्या एका मंत्र्यांनी डॉन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला आहे.
कॉरिडोरमध्ये मृतदेह विखुरलेले
एका प्रत्यक्षदर्शीने डॉन न्यूजला दिलेल्या माहितीनुसार फायरिंग सुरू होताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खाली वाकण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याठिकाणी पोहोचलेल्या अधिका-यांनी आम्हाला बाहेर काढले असेही त्यांनी सांगितले. त्यादरम्यान, शाळेच्या कॉरिडोरमध्ये इतरांचे मृतदेह विखुरलेले होते, असेही ते म्हणाले.
दहशतवाद्यांना मिळाली आहे मोठ्या मुलांना मारण्याची सूचना
तहरीक-ए-तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खोरासनीने एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार शाळेत सहा दहशतवादी आहेत. खोरासनी पुढे म्हणाला की, दहशतवाद्यांना गोळीबार आणि आत्मघातकी हल्ला करण्यासाठी पाठवले आहे. आम्ही दहशतवाद्यांना मोठ्या मुलांना मारून टाका पण लहान मुलांना मारू नका असे आदेश दिले आहेत.
नवाज शरीफ म्हणाले कारवाई थांबणार नाही
पेशावर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, दहशतवाद्यांनी हा हल्ला जर्ब-ए-अब्जच्या विरोधात केला आहे. जोपर्यंत या देशातून दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत दहशतवादाविरोधातील हे युद्ध थांबणार नाही. दहशतवादाविरोधात आम्हाला एकत्र येऊन लढा द्यावा लागेल. अशा हल्ल्यांना देश घाबरणार नाही.
तीन दिवसांचा दुखवटा
हल्ल्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ इस्लामाबादहून पेशावरमध्ये आले. त्यांनी देशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. ते म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाशी तडजोड केली जाणार नाही.' मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्फा हुसेननेही हल्ल्याचा निषेध केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की हल्ल्यात मुत्युमुखी पडेलेल्यांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. हा अत्यंत क्रूर आणि असंवेदनशील हल्ला आहे. यात शेकडो निरपराध मुलांना जीव गमवावा लागला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो....शेवटच्या स्लाइडवर पाहा घटनेचा व्हिडीओ...
(फोटो सौजन्य- डॉन)