आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peshawar Attack, Two Of The Children Killed Were Beheaded

Peshawar : बेछुट गोळीबारच नाही केला, दोन चिमुकल्यांचे शीरही कापले दहशतवाद्यांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - फाईल फोटो
पेशावर - पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी 132 निरागस बालकांची हत्या केली आहे. दहशतवाद्यांच्या संवेदहनहीनपणाचा दाखला देणारी आणखी एक बाब समोर आली आहे. दहशतवाद्यांनी या मुलांना डोक्यात गोळ्या झाडून ठार केले. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. या दहशतवाद्यांनी दोन बालकांचे शीरही कापले होते.

लेडी रीडिंग रुग्णालयाच्या मेडिकल स्टाफने याला दुजोरा दिला आहे. सहाव्या वर्गात शिकणा-या 13 वर्षे वय असणा-या दोन विद्यार्थ्यांचे शीर अद्याप सापडलेले नाही. हॉस्पिटलचे डॉक्टर अनवर अली म्हणाले की, एका विद्यार्थ्याच्या शरिरावर गोळ्यांच्या जखमा आहेत, पण त्याचे शीर सापडत नाही. अली यांनी स्पष्ट केले की, दोन्ही मुलांचे शीर एखाद्या धारदार शस्त्राने कापले गेले असावे.
केवळ आई वडीलांना पटली ओळख
ज्या दोन मुलांचे शीर कापण्यात आले आहे, त्यापैकी एकाची ओळख करणेही अत्यंत अवघड ठरत होते. पण मोठ्या प्रयत्नानंतर मुलांच्या आई वडिलांनी मुलांच्या शरिरावर असणा-या खुणांवरून मुलांची ओळख पटवली.

ISIS कनेक्शनची शंका?
मुलांचे शीर कापल्याची घटना समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या कॉन्फ्लीक्ट कॉलेज ऑफ टेररिझमचे तज्ज्ञ अबदुल्लाह खान यांच्या शंकेवर मोहर लागल्याचे समोर आले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी हा हल्ला ISIS च्या हल्ल्याच्या पद्धतींचा वापर करून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर मृतांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे PHOTO