आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peshawar: Blast Outside Shiite Mosque; 20 Killed, 60 Injured News In Marathi

पेशावरच्या मशिदीत बॉम्बस्फोटांसह बेछूट गोळीबार, 22 ठार, TTP ने जबाबदारी स्विकारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बॉम्बस्फोटात मशिद पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. )

पेशावर- पाकिस्तानातील पेशावरजवळ असलेल्या हयाताबाद भागातील इमामिया शिया मशिदीवर आज (शुक्रवार) तीन आत्मघातकी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात नमाज अदा करायला आलेल्या 22 भाविकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दहशतवादी अजूनही मशिदीत लपले असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी मशिदीला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे.

दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांना कोणी ओळखू शकले नाही. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्विकारलेली नाही. तरीही पाकिस्तानी तालिबान गटावर संशय व्यक्त केला जात आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अशी की, शुक्रवार असल्याने मशिदीत खूप गर्दी होती. स्फोट झाला तेव्हा मशिदीत जवळपास एक हजार लोक उपस्थित होते. स्फोट होताच मशिद परिसरात उभ्या असलेल्या अनेक कार जळून खाक झाल्या.
असा झाला हल्ला
मशिदीत 'जुम्मे की नमाज' पठण केली जात होती. या दरम्यान तीन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात मशिदीत प्रवेश केला. यावेळी मशिदीत फक्त एक सुरक्षा रक्षक तैनात होता. त्याने दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो अयशस्वी ठरला. दहशतवाद्यांनी सुरुवातीला ग्रेनेड फेकले. नंतर गोळीबार केला.

मशिदीत यावेळी एक हजार लोक उपस्थित होते. काही जणांना दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बंदुका हिस्कावून घेतल्या. तिन्ही हल्लेखोरापैकी एकाचे विस्फोटक जॅकेट परिधान केले होते. काही कळण्याच्या आतच त्याने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. स्फोट झाल्यानंतरही अन्य दहशतवादी गोळीबार करत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनास्थळी 'तहरीक-ए-इंसाफ पाकिस्तान' या पक्षाचे नेते इमरान खान पोहोचले आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना मशिद परिसरात प्रवेश दिला नसल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 16 डिसेंबरला पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 निरागस मुलांसह 150 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने स्विकारली होती.
पाकिस्तान सरकारने दहशतवाद विरोधात संपूर्ण देशात नॅशनल अॅक्शन प्लान राबवण्याच्या विचारात आहे. दुसरीकडे, दहशतवादींनी पेशावरमधील एका दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवून आणला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पेशावरमधील स्फोटाची भीषणता दर्शवणारे फोटो...