आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव प्राणी म्हणून आणल्या आणि काळ्या मांजरी मटकावल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्राणी संरक्षणगृहातून काळ्या रंगाच्या मांजरी आणून त्या मित्रांसमवेत मटकावण्याची घृणास्पद घटना इटलीत उघडकीस आली. ब्रियांझा येथील 55 वर्षीय व्यक्तीने गेल्या दोन वर्षांत 15 मांजरींना शिकार केले. पाळीव प्राणी म्हणून आणलेल्या प्रत्येक मांजरीला या व्यक्तीने ठार केले.
गेली दोन वर्षे त्याचा हा किळसवाणा प्रकार सुरू होता. तो संरक्षणगृहात आल्यानंतर नेहमी काळ्या रंगाच्या मांजरीची मागणी करत असे. त्यामुळे एके दिवशी संरक्षणगृहाच्या कार्यकर्त्यांना त्याचा संशय आला. त्यानंतर त्याचे कृत्य उघडकीस आले. काळ्या मांजरीची निर्दयपणे हत्या करून त्या फस्त करणार्‍या त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला किमान एक वर्षाची कैद होऊ शकते.