आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्ये पेट्रोल टंचाई, मुर्सीविरोधात रणशिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - राष्ट्राध्यक्ष महंमद मुर्सी यांच्याविरोधात जनमत पेटले आहे. मुर्सींच्या हकालपट्टीसाठी जनता पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून त्यामुळे इजिप्तमध्ये पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. गुरुवारी राजधानी कैरोत पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय अन्नधान्य भरू न घेण्यासाठी शॉपिंग मॉल, किराणा दुकानांमध्ये झुंबड उडाली.