आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फँटम दाखवणार पुन्हा कमाल, 63 वर्ष केले बच्चेकंपनीचे मनोरंजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - कॉमिक्सच्या दुनियेतील सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय कॅरेक्टर फँटम पुन्हा एकदा बच्चे कंपनीच्या भेटीला येणार आहे. मीडिया, टीव्ही, चित्रपट आणि व्हिडिओ गेममध्ये सर्वाधिक गाजलेले पात्र म्हणून त्याची ओळख आहे. फँटमच्या सुरुवातीच्या अंकांना पुन्हा मांडण्यात येणार आहे. कारण त्या जमान्यातील मास्क असलेल्या सुपरहीरोला पुन्हा एकदा त्याच स्टाइलमध्ये जिवंत ठेवता येऊ शकेल. सुपरमॅन, बॅटमन, मास्क घातलेल्या सुपर हीरोच्या खूप अगोदर फँटमचा जन्म झाला होता. त्यामुळेच मला फँटमला पुन्हा प्रकाशित करायचे होते, असे हर्नेस प्रेसचे डॅनिएल हर्मन यांनी सांगितले. इतर सुपरहीरो 30 दशकाच्या शेवटच्या काही वर्षात लाँच झाले फाक यांनी फँटमला 1936 मध्ये रेखाटले होते.

मास्कवाला पहिला सुपरहीरो

काल्पनिक विश्वातील मास्क धारण करणारा फँटम हा पहिला सुपरहीरो आहे. ली फॉक यांनी या अमेरिकी अँडव्हेंचर कॉमिकमधील पात्राची कल्पना प्रत्यक्षात कागदावर साकारली. 17 फेब्रुवारी 1936 मध्ये पहिल्या कथेसोबत वाचकांच्या भेटीला आला होता. फॉक यांनी या पात्राला घेऊन आपली कॉमिकची साधना 1999 पर्यंत अखंडपणे सुरू ठेवली. त्याचवर्षी फॉक यांचे 13 मार्चमध्ये निधन झाले.

जपानींपासून वाचवणारा

जपानने आगेकूच केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. त्यापासून स्थानिक लोकांचे संरक्षण करण्याचे काम फँटम करत असल्याचे सुरुवातीच्या काही अंकातून दिसते. फँटमचे पात्र अतिशय ताकदीने साकारण्यात आलेले आहे. त्यामुळेच ते आजही आकर्षित करणारे आहे. फँटमविषयी लोक अशी चर्चा करतात, जणू त्याचे अस्तित्व असावे. हीच त्याची ताकद आहे, असे े हर्मन यांनी सांगितले.

दुसर्‍या महायुद्धाचे पडसाद

दुसर्‍या महायुद्धामुळे जगात सर्वत्र उलथापालथ होत होती. 1930 च्या काळात आशियाई देशांविषयी अनेक पूर्वग्रह होते. त्याचे पडसाद फँटमच्या अनेक अंकांमधून पाहायला मिळतात.