आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूरोसायन्सचे सर्वात महत्त्वाचे रुग्ण फिनियास गेजची कथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंटेज फोटोग्राफ संग्रह करणारे जॅक व बेवर्ली विल्गस यांना फिनियास गेज यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. छायाचित्रात रॉड घेऊन दिसत असलेली व्यक्ती गेज आहेत. न्यूरोसायन्सच्या (मेंदूरोगशास्त्र) इतिहासातील गेज यांची केस अत्यंत दुर्मिळ आहे. कित्येक वर्षे त्यांचे हे छायाचित्र बाल्टीमोर येथील बेवर्लीच्या घरात लावलेले होते. डिसेंबर 2007 मध्ये बेवर्लीने हे छायाचित्र स्कॅन करून फ्लीकरवर शेअर केले होते. अनेक दिवसांनंतर एका पत्रकाराने त्यांना फोन करून सांगितले की, हे छायाचित्र फिनियास गेज यांचे असू शकते. जर हे खरे असेल तर हे गेजचे पहिले छायाचित्र असेल.
फिनियास गेज 1848 मध्ये रेल्वेरोड विकासक कंपनीत कार्यरत होते. त्या वेळी ते 25 वर्षांचे होते. त्याच वर्षी 13 सप्टेंबरला रॉडच्या साहाय्याने ते विस्फोटक पदार्थ टाकत होते. स्फोट झाला व तो रॉड गेज यांच्या डाव्या गालातून थेट डोक्याला छेदून काही फुटांवर जाऊन पडला. अपघातानंतर त्यांची मित्रपरिवाराशी असलेली वागणूक बदलली होती. ते आपले प्रकल्प अपूर्ण सोडत असत. ज्या कंपनीचे काम करताना हा अपघात झाला होता, त्यांनीही गेज यांना काम देणे बंद केले. सॅनफ्रान्सिस्को येथे आपल्या कुटुंबीयांसह ते काही दिवस राहिले. 1860 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.