फोटो: कॅलिफोर्नियाच्या मोजेवमधील व्हर्जिन गॅलेक्टिकचे नवीन स्पेसशिप
कैलिफोर्निया- अब्जधिश रिचर्ड ब्रॅन्सन हे त्यांची कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकच्या नव्या स्पेसशीपसोबत स्पेस टुरिझमचे स्वप्न साकार करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच व्हर्जिन गॅलेक्टिक स्पेसक्रॉफ्ट टेस्टदरम्यान क्रॅश झाले होते, ज्यामुळे स्पेस टुरिझमच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला होता. मात्र कंपनी आता याबद्दल पुन्हा प्रयत्न करत आहे.
कॅलिफोर्नियाच्या मोजेव्हमध्ये व्हर्जिन गॅलेक्टिकच्या नवे स्पेसशिप एन 202 व्हिजीच्या निर्मितीसाठी एक टीम दिवसरात्र काम करत आहे. तसेच कंपनीने 2015 पासून स्पेसशिपचे परिक्षण करणार असल्याची घोषणासुध्दा केली आहे. टीमने या प्रकल्पावर सतत दोनवर्षे काम केले आहे. क्रॅश झालेल्या शिपच्या जागी नवीन स्पेसशिप-2 ला आणले जात आहे.
व्हर्जिन गॅलेक्टिकचे सीईओ जॉर्ज व्हाइटसाइड्स यांच्या मते, ''सहा महिन्याच्या आता या स्पेसशिपचे परिक्षण करण्यात येईल. मागील दुर्घटनेतून आम्ही पुर्णपणे बाहेर आलो आहे. सीरीयल नंबर 2 सोबत आम्ही प्रारंभिक सेवांमध्ये उत्तम आणि एक सर्वात चांगले स्पेसशिप बाजारात उतरवत आहोत. कंपनीला अशी अपेक्षा आहे की, टेस्ट फ्लाईटमध्ये आम्हाला यश मिळेल. ''
पुढील स्लाईडमध्ये पाहा, व्हर्जिन गॅलेक्टिकच्या नव्या स्पेसशिपचे फोटो. ...