आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आकाशातून असे दिसते लंडन, पाहा शहराचा नजारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - फोटोग्राफर जेसन हॉक्स यांनी काढलेला फोटो

हजारो किलोमीटर अंतरावरून पृथ्वी पाहण्याचा अनुभव अनोखा असाच असतो. एरियल फोटोग्राफीद्वारे जगाला अशाच वेगळ्या प्रकारे पाहण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर अशा उंचीवरून पृथ्वीचे सौंदर्यही अत्यंत वेगळे असे पाहायला मिळते. जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणा-या लंडन शहराचेही असेच काही एरियल फोटो यामाध्यमातून दाखवणार आहोत. फोटोग्राफर जेसन हॉक्स यांनी ही छायाचित्रे काढलेली आहेत.


हॉक्स गेल्या 20 वर्षांपासून हेलिकॉप्टरच्या मदतीने लंडनमध्ये फोटोग्राफी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लंडनची फोटोग्राफी करत आहेत. याठिकाणी असलेले टॉवर ऑक्सफोर्ड सर्कस, न्यू बिल्डिंग वॉकी-टॉकी, चीज ग्राटर, बकिंगहम पॅलेस, वेस्टमिन्स्टर, हर्न हिल येथील ब्रॉकवेल पार्क लीडो, मिलेनियम डोम, रॉयल अल्बर्ट हॉल समोरील केंसिग्टन गार्डनमध्ये अल्बर्ट मेमोरियलची फोटोग्राफी केली आहे.
लंडनशिवाय हॉक्सने जगभरातील अनेक ठिकाणी एरियल फोटोग्राफी केली आहे. त्यांनी फोटोग्राफीवर 50 पुस्तकचे लिहिली आहेत. कोणत्याही ठिकाणी फोटोग्राफी करण्याआधी ते संबंधित ठिकाणी हेलिकॉप्टरमधून तीन ते चार फे-या मारतात आणि चांगला शॉट कसा येईल त्यासाठी रिसर्च करतात.
पुढील स्लाइडवर पाहा, हॉक्स यांनी काढलेले PHOTO