इंटरनॅशनल डेस्क - स्वप्नाचे जग हे खूप वेगळे असते. अस वाटत, की आपण स्वप्नामध्ये जे काही पाहिले आहे, ते वास्तवात आपल्याबरोबर घडत आहे. काही वेळा पाहिलेली स्वप्ने खरी ही होतात. यामुळे प्रश्न निर्माण होतो तो हा, आपल्या आयुष्याचे पुस्तक अगोदरच लिहिण्यात आले आहे का ? येणा-या घटनांचे पाने आपण उलटत तर नाही ना ?
रेनेन गोल्डमॅन इस्त्रायलमधील तेल अवीवा येथे राहतो. ते व्यवसायांने कलाकार आणि एक कॉन्सेप्च्युल फोटोग्राफर आहेत. कॉन्सेप्च्युल फोटोग्राफीत अॅब्सट्रॅक्ट आणि नॉन कॉक्रीट वस्तू जेव्हा ती अर्थपूर्ण होतात तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो. मी याच गोष्टीं विचारात घेऊन पर्सनल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स तयार करतो, असे रेनेन याने सांगितले.
त्यांच्या छायाचित्रांची सीएनएन, हफिंगटन पोस्ट आणि डेली मेल सारख्या मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रशंसा केली आहे. रेनेनच्या म्हणण्यानुसार, तो स्वत: स्वप्नांवर आधारित छायाचित्रांकरिता गेल्या सात वर्षांपासून काम करत आहे. स्वप्नांप्रमाणे ती छायाचित्रे ही वास्तव वाटतात. जेव्हा तुम्ही छायाचित्रे पाहताल, तेव्हा त्यात एक वेगळा आनंद, सायकोलॉजिकल डिसऑर्डर आणि विचित्रता दिसते.
पुढे पाहा छायाचित्रातून स्वप्नांचे जग....