फोटो: ऑस्ट्रेलियातील ग्रेट ओशियन रस्ता
जगातील सर्वात मोठे युध्द स्मारक म्हणून ऑस्ट्रेलियातील ग्रेट ओशियन रस्त्याला ओळखले जाते. टॉर्क्वे आणि अलन्सफोर्ड या शहरा दरम्यान पहिल्या महायुध्दातून परतलेल्या सैन्याने रस्त्याची निर्मिती केली होती. देशाच्या नैर्ऋत्य भागात बनवण्यात आलेल्या या रस्त्याची लांबी 243 किलोमीटर आहे.ऑस्ट्रेलिया सरकारने त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
तयार करण्यासाठी लागली 14 वर्षे
रस्ता बांधणीला 1918 साली सुरुवात झाली. यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर करण्यात आले नाही. रस्ता दोन भागात पूर्ण करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1932 मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर सर व्हिलियम आयर्विन यांनी त्याची औपचारिक पध्दतीने सुरु केले.
पर्यटकांचे आकर्षण केंद्र
ऑस्ट्रेलियात येणा-या पर्यटकांसाठी ग्रेट ओशियन रोड आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. रस्त्याच्या एका बाजूला समुद्रकिनारा आणि दुस-या बाजूला सदाहरितने आणि चुनखडीचे पर्वते आहेत. येथे दुहेरी वाहतूक असून चालकाला 80 ते 100 किमी प्रति तास गाडीचा वेग ठेवावा लागतो.
पुढे पाहा ग्रेट ओशियन रोड आणि त्याच्या आसपासची खास ठिकाणांची छायाचित्रे...