आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे जगातील सर्वात सुंदर कॅसलपैकी एक जर्मनीतील होहेनझोलर्न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आहे जर्मनीतील माऊंट होहेनझोलर्न या पर्वतावर वसलेला होहेनझोलर्न कॅसल. या पर्वतावरूनच या कॅसलला हे नाव दिले आहे. हा कॅसल होहेनझोलर्न परिवाराची अंतिम निशानी मानली जाते. या परिवाराने जर्मनीवर अनेक काळ राज्य केले. पर्वत आणि मध्यभागी जंगल असल्याने या कॅसलला पाहणे म्हणजे एक विहंगम दृश्याचा नजारा असतो. समुद्रतळापासून या पर्वताची व कॅसलची उंची आहे 2805 फूट आहे.
हा होहेनझोलर्न कॅसल तिस-या वर्जनमधील आहे. म्हणजेच या कॅसलला तीन वेळा बनविण्यात आले आहे. प्रूशियाचा राजा फ्रेडरिक विलियम-4 ने 1846-1867 या दरम्यान हा कॅसल बनवला होता.

कॅसलला जेव्हा तिस-यांदा आधुनिक पद्धतीने बनविला तेव्हापासून येथे कोणीही राहत नव्हते. त्याला एक शो पीस पद्धतीने ठेवला गेला. प्रिन्स विलियम मात्र काही महिने या कॅसलमध्ये राहिला होता.

3 सप्टेंबर 1978 रोजी हा कॅसल बंद करण्यात आला. याचे कारण भूकंपामुळे या कॅसलचे खूप नुकसान झाले होते. यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता ज्यामुळे नंतर तो बंद करण्यात आला.
पुढे पाहा, होहेनझोलर्न कॅसलची छायाचित्रे...