(चीनमधील रेड सी-बीच)
दावा - चीनमधील दावा काउंटीमध्ये रेड सी-बीच आहे. हे जगभरातील सर्वात मोठे वेटलॅँड आहे. येथे असलेल्या लाल रंगातील एक वेगळ्या प्रकारच्या गवतामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ईस्ट-एशिया ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणारे प्रवासी पक्षी या बीचवर आराम करण्यासाठी थांबतात. सध्या हे ठिक़ाण पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिक़ाण असल्याने आणि गर्दीदेखील वाढत असल्याने येथे त्यांच्या सोईसाठी रेल्वे आणि रोड सेवा विकसित करण्यात आली आहे.
वेगळेपण
या बीचचे वेगळेपण म्हणजे येथे 260 पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आणि 399 पेक्षा अधिक प्रकारचे जंतु सापडतात. 1988 मध्ये हे ठिक़ाण राज्य स्तरीय संरक्षण स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.
बीचपर्यंत पोहोचण्यासाठी 680 मीटर लांब ब्रिज
या ठिक़ाणी फिरायला येण्यासाठीचा योग्य काळ म्हणजे ऑक्टोबर महिना. ऑक्टोबरमध्ये येथील गवत पूर्णपणे लाल झालेली असते. येथून जवळपास राहण्यासाठीचे टूरिस्ट रिसॉर्ट बीचपासून साधरण 18 किमी अंतरावर आहे. येथे बीचपर्यंत पोहोचण्यासाठी 680 मीटर लांब ज़िग-जॅग ब्रिज तयार करण्यात आला आहे. हा ब्रिज 519 लाकडांच्या खांबांवर उभा आहे.