सियालकोट - भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफने बुधवारी रात्रभर सीमेवर केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या 45 चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानी माध्यमांमधील वृत्तानुसार, भारतीय लष्कराने सियालकोटमध्ये केलेल्या गोळीबारात गुरुवारी सकाळी दोन पाकिस्तानी ठार झाले.
चिनाब रेंजर्सच्या माहितीनुसार, सीमेवर सुरु असलेल्या या संघर्षात पाकिस्तानचे आतापर्यंत 17 जण मारले गेले आहेत तर, 43 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर, घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सियालकोटमध्ये झालेल्या गोळीबारांनंतर गावकरी घरदार सोडून सुरक्षीतस्थळी रवाना झाले आहेत.
पाकिस्तान सध्या 'चोराच्या उलट्या बोंबा' असे वागत आहे. त्यांनी भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. सीमेवर तैनात रेंजर्सचे म्हणणे आहे, की भारताला सीमेवर शांतता नको आहे. म्हणून ते सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. या वर्षात भारताने 21 व्या वेळेस शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्र संघटनेने या भागाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
(छायाचित्र - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट भागातील धामला गाव)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोट भागातील धामला गावाची परिस्थिती