फोटो - पेशावर हल्ल्यातील मारला गेलेला दहशतवादी
पेशावर - तहरीक-ए-तालिबान (पाकिस्तान) ने आर्मी स्कूलमध्ये क्रौर्याचा कळस गाठणा-या 7 हैवानांचे फोटो जारी केले आहेत. एवढेच नव्हे तर या हल्ल्याचा जराही पश्चाताप नसल्याची प्रतिक्रिया देत, त्यांच्यात मानवी संवेदना नसल्याचेही संघटनेने दाखवून दिले आहे. पेशावरच नव्हे तर संपूर्ण जगच अद्याप मंगळवारच्या या हल्ल्याच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरसानीने हल्ल्याचे कारणही सांगितले. तो म्हणाला की, शाळेला लक्ष्य करण्याचे कारण म्हणजे, येथे सैनिकांची मुले शिकतात. खुरसानीच्या मते वझीरिस्तानात पाकिस्तान सराकरकडून केल्या जणा-या कारवाईत त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्या झाली. त्याचा बदला म्हणून हे हत्याकांड करण्यात आले.
खुरसानीने पाकिस्तानच्या नागरिकांना ही धमकीही दिली की, त्यांनी लष्कराशी कोणताही संबंध ठेऊ नये अन्यथा त्याचा परिणाम भोगण्यास तयार राहावे. लष्कराने जिहादींच्या कुटुंबीयांना अटक करून त्यांना बनावट चकमक प्रकरणांत मारल्याचा आरोपही खुरसानीने केला आहे.
दहशतवादी हल्ल्यात 132 मुले आणि 9 कर्मचा-यांची हत्या झाल्यानंतर बुधवारी पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी अफगाणिस्तानला धमकीवजा इशारा दिला की, त्यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुखिया मुल्ला फजलुल्ला पकडण्यासाठी मदत करावी, अन्यथा पाकिस्तान स्वतः कारवाई करेल.
पुढे पाहा, संबंधित फोटो...