इंटरनॅशनल डेस्क - आधुनिक युगात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणूस जगातील कोणत्याही भागाशी सहज संपर्क साधू शकतो. परंतु कोणतीही सुविधा नसताना, उणे 40 डिग्री तापमानात जीवन कसे असेल, या प्रश्नाचे उत्तर छायाचित्रकार जिमी नेल्सनने छायाचित्रांच्या माध्ममातून जगासमोर आणले आहे. जिमीने आपला 'बिफोर द पास अवे' या प्रकल्पातंर्गत प्रत्येक वर्षी 5 ते 10 वेळा अशा ठिकाणी राहिला आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या आदिवासींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
जगातील प्रत्येक भागातील आदिवासींबरोबर जिमीने दोन आठवडे घालवली. या दरम्यान तो त्यांची परंपरा, संस्कृती आणि जीवन जगण्याच्या पध्दतींशी खूप समरस झाला. त्यांनी ती आपल्या कॅमे-यात कैद केली. छायाचित्रांमध्ये त्याने आदिवासींचे पारंपरिक दागदागिणे, केशरचना आणि वेशभूषा दाखवली आहे.
अशा महत्त्वाकांक्षी छायाचित्रकारी प्रकल्पाच्या साहाय्याने जगाला मला असा दस्ताऐवज द्यायचा आहे, जो काळाच्या कसोटीवर टिकून राहिल, असे जिमी सांगतो. जगातील सर्व आदिवासींचे एक नोंदणी असेल. ते काळाबरोबर आधुनिकतेकडे वाटचाल करत आहेत. पुढे तुम्हाला 25 अशा अादिवासींचे छायाचित्रे दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रकार जिमी नेल्सनच्या प्रोजेक्ट अंतर्गत जगभरातील वेगवेगळ्या 25 अशा आदिवासींचे छायाचित्रे....