सुमारे 4.60 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे एकमेव मालक आणि जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांचा आज (सोमवार) वाढदिवस आहे. हा त्यांचा 58 वा वाढदिवस आहे. याच दिवशी 1955 मध्ये बिल गेट्स यांचा अमेरिकेत जन्म झाला. यानिमित्त आम्ही त्यांच्या 100 खोल्यांच्या शानदार बंगल्याविषयी माहिती देणार आहोत.
याच बंगल्यात ते चक्क व्हेल आणि शार्क यांच्यासोबत राहतात हे ऐकून तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही.
तसे बघितले तर बिल गेट्स यांच्याकडे अनेक बंगले आहेत. परंतु, अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात असलेला अल्ट्रा लक्झरी बंगला त्यांना विशेष आवडतो. सुमारे 66,000 स्केअरफूट जागेवर असलेल्या या बंगल्यात अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे याला Xanadu 2.0 अशा निकनेमने ओळखले जाते.
जमिनीवर स्वर्गासम सुविधा देणाऱ्या या बंगल्याची किंमत तब्बल 150 मिलियन डॉलर आहे. या बंगल्याचे एरिअल व्हू बघितल्यावर हे एखादे शहरच असावे असे वाटते.
या बंगल्यात मोठ-मोठे बेडरुम्स, 24 बाथरूम, 6 किचन, 6 फायरप्लेस, 11,500 स्केअरफूट जागेवर कुटुंबीयांसाठी खास क्वार्टर आणि 2,100 स्केअरफुट जागेवर खासगी वाचनालय उभारण्यात आले आहे. या बंगल्याला तब्बल 84 पायऱ्या आहेत. हा बंगला 92 फूट लांब आणि 63 फूट उंच आहे.
बिल गेट्स यांच्याकडे लग्झरी कारची श्रेणी आहे. या कार ठेवण्यासाठी त्यांनी तीन गॅरेजची निर्मिती केली आहे. यातील एका गॅरेजमध्ये 10 कार ठेवण्याची जागा आहे. विशेष म्हणजे 6,300 स्केअरफूट जागेवर हे गॅरेज आहे. मनोरंजनासाठी या बंगल्यात 20 लोकांच्या आसन क्षमतेचे एक स्वतंत्र सभागृह आहे.
या बंगल्यात प्रवेश केल्याबरोबर एक मोठे रिसेप्शन हॉल आपले स्वागत करते. यात सुमारे 150 पाहुणे सहज जेवण करू शकतात. सुमारे 200 लोकांची कॉकटेल पार्टी करण्याची सुविधा या रिसेप्शन हॉलमध्ये आहे.
या बंगल्यात अंडरवॉटर म्युझिक सिस्टिमसह पूल, 2500 स्केअरफूट जागेवर जीम आणि 1000 स्केअरफूट जागेवर डायनिंग रुम आहे.
पुढील स्लाईडवर बघा, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा शानदार बंगला...