आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Physics Nobel Prize Declared To Peter Higs, Franks Englart

पीटर हिग्ज, फ्रँकस एंग्लर्ट यांना भौतिकशास्‍त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीटर हिग्ज - Divya Marathi
पीटर हिग्ज

स्टॉकहोम - पदार्थांना वस्तुमान मिळवून देणा-या कणांचा शोध लावणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज आणि बेल्जियमचे फ्रँकस एंग्लर्ट या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.


या दोघांनी 1964 मध्ये ‘हिग्ज बोसॉन’ची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. नंतर विश्वनिर्मितीचे गूढ शोधण्यासाठी फ्रान्स सीमेवर ‘सर्न’ने उभारलेल्या प्रयोगशाळेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ध्वन्यातीत वेगाने धडकवून ‘हिग्ज बोसॉन’ शोधण्यात आला. प्रयोगातून सापडलेला हाच कण विश्वनिर्मितीचे गूढ असल्याच्या निष्कर्षावर नंतर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.