आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- मंदीच्या फे-यामुळे ब्रिटनमध्ये बेकारीचे प्रमाण वाढले आहे. हाय फंडा लाइफस्टाइलची सवय लागलेल्या ब्रिटिश जनतेत पैशांची चणचण जाणवू लागल्यामुळे आता दुकाने,मॉलमध्ये ‘उचलेगिरी’चे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेष म्हणजे पूर्वी नागरिक भरपूर खरेदी करायचे त्याच दुकाने,मॉलमध्ये हे लोक आता डल्ला मारतात असे गुन्हेगारी विरोधी पथकाने म्हटले आहे.
युरोपातील आर्थिक संकटामुळे ब्रिटनमध्येही अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. नोकरीत असताना बक्कळ पैसा खिशात खुळखुळत होता. हवी तशी खरेदी करता येत होती.अनेक जण ‘मौल्यवान ग्राहक’ ‘सन्माननीय ग्राहक ’म्हणून ओळखले जायचे पण यापैकी काही ग्राहकांना आता आर्थिक चणचणीपायी मॉल, दुकानांमध्ये हळूचपणे डल्ला मारताना,उचलेगिरी करताना पकडण्यात आले असे ‘सिटी वॉच’नावाच्या कंपनीला आढळून आले आहे.लिसेस्टर परगण्यात सिटीवॉच कंपनी अनेक दुकाने,उद्योगांच्या सहकार्याने दुकाने,मॉल,बाजारातील बारीकसारीक घडामोडींवर निगराणी करते.
लिसेस्टरमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे सांगून मंदी आणि बेरोजगारी हे यामागे प्रमुख कारण असल्याचे कोलिन्स यांचे म्हणणे आहे. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल परंतु केवळ नोक-या गमावल्याने असे होत असावे असा अंदाज आहे.कारण सदैव शानशौक,छंदी-फंदी जीवन जगणा-या लोकांना आता नोक-या गमावल्याने आपले छानछौक करता येत नाहीत.त्यामुळे भुरटया चो-यांचे प्रमाण वाढले आहे. कदाचित एक क्षणाचा मोह अथवा जाणूनबूजूनही होत असावे परंतु डल्ला मारणा-यांमध्ये मध्यमवर्गींय जास्त आहेत.सिटीवॉचने उचलेगिरी करणा-या लोकांची नावेच वेबसाइटवर टाकली असून यामुळे अशा गोष्टींना आळा बसेल. असे कोलिन्स यांनी सांगितले.
कशावर अधिक डल्ला
वस्तूंवर डल्ला मारण्यात 30 ते 40 वयोगटातील महिलांचीच संख्या अधिक आहे. या महिला प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने,परफ्युम्स अशा गोष्टीं हळूचपणे पर्समध्ये टाकतात असे सिटीवॉच चे गुप्तचर अधिकारी ग्रॅहम कोलिन्स यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.