आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics Of 100 Year Old Legal Prostitution Place In America

अमेरिकेतील मान्‍यताप्राप्‍त वेश्‍यालयाची 100 वर्षे जुनी दुर्लभ छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत शंभर वर्षांपूर्वीच वेश्‍या व्‍यवसायाला कायदेशीर मान्‍यता देण्‍यात आली होती. एक छायाचित्रकार मार्क मॅकऍंड्यू यांनी नेवाडा येथील ग्रामिण भागातील वेश्‍यालयांमध्‍ये जवळपास 5 वर्षे काढली. त्‍यांनी तेथील खासगी आयुष्‍य कॅमे-यात कैद केले. 'प्रोजेक्‍ट नेवाडा रोज'अंतर्गत त्‍यांनी तेथे पोटापाण्‍यासाठी वेश्‍यावृत्ती करणा-या महिलांची छायाचित्रे काढली. वेश्‍याव्‍यवसाय हा जगातील सर्वात प्राचीन व्‍यवसाय आहे. परंतु, त्‍यात गुंतलेल्‍या महिलांचे आयुष्‍य अतिशय विदारक आहे. मार्क यांनी याच महिलांचे जगासमोर न आलेले चित्र समोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला. असे प्रयत्‍न करणारे मार्क पहिले छायाचित्रकार नाहीत. अमेरिकेतील प्रसिद्ध छायाचित्रकार जॉन अर्नेस्‍ट जोसेफ बेलॉक यांनी 1912 मध्‍ये रेड लाईट परिसरातील काही छायाचित्रे काढली होती.

न्‍यू ओर्लियंस येथील स्‍टोरीविलेमधील वैध वेश्‍यालयाची छायाचित्रे जवळपास 100 वर्षे जुनी आहेत. विशेष म्‍हणजे, 1917 मध्‍येच या ठिकाणची वेश्‍यालये बंद झाली होती. ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्‍यात येऊ नये, अशी जोसेफ यांची इच्‍छा होती. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर अनेक वर्षांनी या छायाचित्रांबाबत माहिती मिळाली. फोटोग्राफर ली फ्रीडलेंडर यांनी या छायाचित्रांना शोधून काढले आणि ई. जे. बेलॉक स्‍टोरीविले पोर्टेट्स या नावाने प्रकाशित केले.

बेलॉक यांनी ही छायाचित्रे काढली त्‍यावेळेस समाज अतिशय संकोचित मनो‍वृत्तीचा होता. लहान गोष्‍टींवर आक्रमक होणारा होता. आज ही छायाचित्रे पाहताना तत्‍कालीन आणि आताच्‍या परिस्थितीची तुलना करता येईल.

बेलॉक यांनी काढलेली छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर....