आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PICTURS: Pakistan Worst Country In Gender Equality

PHOTOS : या आहेत पाकिस्तानच्या महिला पोलिस-सैनिकी अधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच जगभरात लैंगिक समानतेचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यात लैंगिक समानतेच्या बाबतीत सर्वात खालच्या पातळीवर असलेल्या देशांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत आपला शेजारी देश पाकिस्तानचाही क्रमांक लागला आहे. जागतिक स्त्री- पुरुष असमानता अहवाल 2013 मध्ये 136 देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 135 वा आहे. या अहवालात सांगितले गेले आहे की, समान सुविधा आणि चांगल्या संधींचा फायदा स्त्री आणि पुरुषांना समान पद्धतीने दिल्या जात आहे की नाही. यात आइसलँड हा देश सर्वोत्तम असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
पाकिस्तानसाठी त्यातही जमेची बाजू म्हणजे यमनपेक्षा (136) त्यांची स्थिती बरी आहे. या यादीत पाकिस्तानला आर्थिक बाबतीत सर्वाधिक वाईट देश आणि शिक्षणाबाबत वाईट स्थिती असलेला आठवा देश, आरोग्याबाबत 13 वा क्रमांक देण्यात आला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे स्त्री-पुरुषांच्या भागीदारीच्या बाबतीत त्यांचा क्रमांक 64 वा आहे. या बाबत भारताची स्थिती मात्र वाईट आहे. भारताचा क्रमांक शंभराच्या (101) पुढे गेला आहे. चीन आणि बांगलादेश क्रमशः 69 आणि 75 व्या स्थानावर आहेत. यातही आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानला गेल्याच महिन्यात त्यांची पहिली महिला पायलट मिळाली आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे पोलिस दल आणि लष्करातही पाकिस्तानी महिला मोठ्या संख्येने भरती होत आहेत. याबाबतीत पाकिस्तानमध्ये थोड्या सुधारणा होत आहेत. इंटरनेट जगतात पाकिस्तानच्या महिला पोलिस आणि लष्करातील महिलांना सर्वाधिक आकर्षक संबोधले जाते.