आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये शस्त्रबंदीचा अखेर चाप ओढला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


न्यूयॉर्क - देशभरात शालेय पातळीवरील वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये बंदूक वापरावर बंदी आणणारा कडक कायदा करण्यात आला आहे. अशा प्रकारचा कायदा करणारे न्यूयॉर्क हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. सिनेटमध्ये याविषयीच्या कडक कायद्याच्या प्रस्तावाला कौल मिळाला आहे. व्यापक पातळीवर शस्त्र वापरास बंदी आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. अत्यंत कडक आणि व्यापक स्तरावरील कायदा म्हणून याचे वर्णन करण्यात आले आहे. कनेक्टिकटमधील शाळेत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अमेरिकेत शस्त्र वापराविषयी सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. नवीन कायद्याचे विधेयक आता कनिष्ठ सभागृहाकडे पाठवले जाणार आहे. कनिष्ठ सभागृहात शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.