आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plane Carrying Chile Soccer Stars Found After 54 Years News In Marathi

तब्बल 54 वर्षांनंतर सापडले चीलीच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंटिएगो- चीलीमधील एंडीज पर्वतरांगांवर भटकंती करणार्‍या गिर्यारोहकांना तब्बल 54 वर्षांपूर्वी कोसळलेल्या एका विमानाचे अवशेष सापडले आहे. सेंटिएगोच्या दक्षिणेला जवळपास 360 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. विमानाचे अवशेष 3,200 मीटर उंचावर दिसल्याचे गिर्यारोहकांनी म्हटले आहे.
'डग्लस डीसी-3' असे या विमानाचे नाव असून ते 3 एप्रिल, 1961 रोजी बेपत्ता झाले होते. विमानात एका फुटबॉल संघाचे खेळाडू होते. सगळे फुटबॉलपटू कोपा डे चिलीहून सामना खेळून सेंटिएगोला परतत होते.