आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमध्ये विमानाचे इमर्जंसी लँडिंग करताना भीषण अपघात, 51 प्रवाशांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपेइ - तैवानमध्ये बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये 48 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचे इमर्जंसी लँडींग करताना हा अपघात झाला. यात आणखी 14 जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळाली आहे.

तैवानमध्ये सध्या 'मात्मो' वादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळेच विमानाला इमर्जंसी लँडिंग करावी लागली. त्यावेळी या विमानाचा अपघात झाल्याचे हवाई वाहतूक विभागाचे संचालक जीयान शीन यांनी सांगितले. मांगोंग बेटावरील विमानतळावर जीई222 या विमानाला हा अपघात झाला.

तैपेइहून पेंगूला जात होते विमान
खराब हवामानामुळे दुस-यांदा विमानाची लँडींग केली जात होती. त्यावेळी हा आपघात झाला. हे विमान राजधानी तैपेइहून पेंगूला जात होते. पेंगू हे कमी लोकसंख्या असणारे एक बेट आहे. तैवानची प्रमुख वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार विमानात 54 प्रवाशी आणि 4 क्रुमेंबर्स होते. विमान ट्रान्स एशिया एअरवेजचे होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्वीटरवर शेअर झालेले अपघाताचे फोटो आणि 'मात्मो' वादाळानंतरची तैवानमधील स्थिती