आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॅनेट सोलार : सौरऊर्जेच्या अक्षय स्रोताची क्षमता सिद्धी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टुरेनर प्लॅनेट सोलार ही सौरऊर्जेवर चालणारी जगातील सर्वात मोठी बोट आहे. या बोटीने रविवारी पॅरिसजवळील सीन नदीमध्ये फेरफटका मारला. कोणतेही पारंपरिक इंधन न वापरता जगाची भ्रमंती करता येऊ शकते, हे दाखवून देण्यासाठी स्वित्झर्लंडमधील गुंतवणूकदार आणि जर्मनीच्या अभियंत्यांच्या एका गटाच्या संयुक्त प्रयत्नातून शंभर टन वजनाची सोलार प्लॅनेट साकारली आहे. सौर ऊर्जेची अमर्याद क्षमता सिद्ध करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे राशेल ब्रदर्स डी प्यूक्रीडन अभिमानाने सांगतात. 4 मे 2012 रोजी प्लॅनेट सोलारने 584 दिवसांत 60,000 किलोमीटर जगभ्रमंती पूर्ण केली. जागतिक हवामान बदलाबद्दल जागृती करण्यासाठी आता ती देशोदेशीच्या दौ-यावर निघाली आहे.