आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planing To Remove Syrian President Asad, Set Up Care Taker Government

सिरिया तिढा: असाद यांची हकालपट्टीचा डाव,हंगामी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँट्रेक्स (स्वित्झर्लंड) - सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांची हकालपट्टी करून हंगामी सरकार स्थापन करण्याचा चंग अमेरिकेसह पाश्चात्त्य राष्ट्रांनी बांधला आहे. सिरियाप्रश्नी शांतता परिषदेच्या पहिल्याच दिवशी असाद यांच्या हकालपट्टीचा विषय निघताच समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप एवढे विकोपाला गेले की, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना हस्तक्षेप करावा लागला; परंतु मून यांचेही सदस्यांनी ऐकले नाही.
परिषदेच्या प्रारंभी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी हंगामी सरकारचा मुद्दा उपस्थित केला. जून 2012 मध्ये जिनिव्हात झालेल्या पहिल्या बोलणीतच सिरियात परस्पर सहमतीने हंगामी सरकार स्थापन करण्याचा ठराव झाला होता. हा ठराव म्हणजे देशात शांततामय पद्धतीने बदल घडवण्याचा मार्ग आहे. या मार्गात केवळ एक अडथळा आहे- तो म्हणजे असाद घराणे. जनतेच्या आंदोलनास क्रूरपणे चिरडण्याचा प्रयत्न करणारे असाद हंगामी सरकारचा भाग असू शकत नाहीत, असे केरी यांनी सांगितले.
* परराष्ट्रमंत्री मौलेम यांचा पाश्चात्त्य राष्ट्रांना इशारा
* प्रथमच आमने-सामने
सिरियाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आयोजित या परिषदेत प्रथमच असाद सरकार व विरोधक राष्ट्रीय आघाडीचे प्रतिनिधी आमने-सामने आले आहेत. गतवर्षी जिनिव्हात झालेल्या पहिल्या बोलणीत सिरियात सत्तांतर घडवण्याचा रोडमॅप ठरवण्यात आला होता.
टाइम इज ब्लड : असाद सरकारने तत्काळ जिनिव्हा करारावर स्वाक्षरी करून हंगामी सरकारसाठी वाट मोकळी करून द्यावी. कारण वेळ दवडणे म्हणजे आणखी रक्तपात. सिरियन जनतेसाठी ‘टाइम इज ब्लड’ झाले आहे, असे मत राष्ट्रीय आघाडीचे प्रमुख अहमद जारबा म्हणाले.
वेळ संपली तरीही भाषणबाजी : भाषणासाठी प्रत्येकाला दहा मिनिटांची वेळ दिला होता, परंतु मुलेम यांची भाषणबाजी थांबेचना. त्या वेळी सरचिटणीस मून यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही उपयोग झाला नाही.
असाद यांना हटवण्याचा अधिकार नाही : सिरियाचे परराष्ट्रमंत्री वालीद अल मौलेम यांनी आपल्या भाषणात पाश्चात्त्य राष्ट्रांची खरडपट्टी काढली. सिरियन रक्त हातात घेऊनच काही देश इथे बोलणी करण्यासाठी आले आहेत. मात्र, सिरियन जनतेशिवाय असाद यांना हटवण्याचा जगात कुणालाच अधिकार नाही, अशा शब्दांत मौलेम यांनी इशारा दिला.
थेट बोलणी उद्यापासून
सिरिया प्रश्नावर थेट बोलणी शुक्रवार, 24 पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी सुमारे 40 परराष्ट्रमंत्री आपले मत मांडणार आहेत.