आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plight Of Children In The World\'s Newest Country South Sudan

आफ्रिकेतील या देशात मुलांची स्थिती का आहे भयावह? जाणून घेण्‍यासाठी वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण सुदान नव्यानेच उदयाला आलेला देश आहे. आफ्रिका खंडात मध्‍यवर्ती स्थान असलेल्या या देशाला सहा राष्‍ट्रांची सीमा लागून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे नागरी युध्दासारखी स्थिती आहे. तेलाच्या दृष्‍टीने हा देश संपन्न आहे. पण तुम्ही जर येथील छायाचित्रे पाहिली, तर तुम्हाला या देशातील वास्तव काय आहे याचा अंदाज येईल. या देशाचा समावेश सर्वात कमी विकसित असलेल्या राष्‍ट्रांमध्‍ये होतो.
नागरिक घर सोडण्‍याच्या तयारीत
वांशिक हिंसेमुळे 13 लाखांपेक्षा जास्त नागरिक घर सोडण्‍यास विवश झाले आहेत. हजारोंना आपले प्राण गमावले लागले आहे. दरम्यान संयुक्त राष्‍ट्र संघाचे महा‍सचिव बान की मून यांनी शांतता राखण्‍याचे विनंती केली आहे.
60 लाख लोकांना गमावे लागेल जीव
जर वांशिक संघर्ष असाच चालू राहिला, तर वर्षाच्या अखेरपर्यंत दक्षिण सुदानमधील 20 लाख लोकांपैकी अर्ध्‍यांना घर सोडून जावे लागेल किंवा भूक, हिंसा याने जीव गमावावा लागेल, असा मून यांनी इशारा दिली आहे.

राहायचे छत्र हिसकावले
पावसाळ्यात येथील लोकांची खूप दैना होते. डोक्यावर छप्पर नाही. जखमींवर उपचार करणे अशक्य होत आहे. ज्यांना राहायला घर नाही, ते शेजारांच्या घरी राहत आहेत. सुदानी लोकांना मदतीची खूप गरज आहे, असे साराह मेनार्ड यांनी सांगितले. मेनार्ड या प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर आहेत.

50 मुलांमध्‍ये कुपोषणाचे गंभीर लक्षण
कुपोषित मुलांच्या देखरेखीसाठी डॉक्टरांची टीम काम करत आहे. या टीमला 600 मुलांपैकी 50 मध्‍ये गंभीर कुपोषणाचे लक्षणे सापडली आहेत. येथील नागाउ बेल दोहर नावाची महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलाला कसोशिने प्रयत्न करूनही वाचवू शकली नाही. यावरून येथील गंभीर परिस्थितीचा अंदाज येतो.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा दक्षिण्‍ा सुदानची स्थिती....